१ मे महाराष्ट्र दिन
१ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यामूळे १ मे हा महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा केला जातो. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आंदोलने केली आणि ह्या आंदोलनात १०५ हुतात्मे शहिद झाले ह्या हुतात्म्यांच्या बलिदानमूळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमतं घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्यामुळेच आज १ मे आपण महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा करतो. मनाचा मुजरा ह्या शाहिद हुतात्म्यांना.
आज महाराष्ट्र कोरोना रुपी संकटात सापडलेला आहे. सरकारने या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन केलेला आहे. सर्वजण घरात अडकून पडले आहेत. जो तो स्वतःची व स्वतःच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी स्वतःला घरात बंदीस्त करून घेत आहे. तरीही त्यात हजारो हात बाहेर राबत आहेत. आपण सुरक्षित राहावं म्हणून स्वतःच्या आणि परिवाराच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काम करत आहे. जे घरात बंदीस्त सामान्य लोक आहेत त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. खरच सलाम त्यांच्या शौर्याला. कोरोना काळात ज्या कोरोना योध्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम ज्ञात अज्ञात कोरोना योध्याना महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मानाचा मुजरा.
जय महाराष्ट्र...


उत्तर द्याहटवाह्यूएन्त्संगाचे महाराष्ट्र-वर्णन मोठे अर्थपूर्ण आहे. तो म्हणतो " या भागातील जमीन सुपीक असून मशागतीखाली आहे. हवामान ऊष्ण आहे. लोक धाडसी, उमदे परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत. विद्याभ्यासाचे चाहते आहेत. उपकारकर्त्याचे ऋण ते कधीही विसरणार नाहीत. मदतीसाठी हात पुढे केला तर ते जरूर धावून येतील, परंतु कोणी अपमान केला तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करायचा आहे, त्याला ते पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणा-या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील."
महाराष्ट्रदिनाच्या तसेच कामगार दिनाच्या तमाम मऱ्हाठमंडळींना खूप खूप शुभेच्छा...!!!💐💐💐