पूर्वी काळी न्युज कशी असायची तर दूरदर्शन वरील संध्याकाळी ७.०० च्या बातम्या आजोबांन पासुन ते आपल्या आई वडिलांना पर्यंत सुरू असलेल्या. मला अजून आठवत आहे लहान पणी रोज त्या ७.०० च्या बातम्या आम्हाला बाकी सर्व प्रोग्राम बंद करायला लागत होते कारण संध्याकाळी ७.०० वाजले की दिवस भरतील सर्वच घडामोडी समजत होत्या म्हणून आवर्जून सर्वच जण त्या बातम्या बघत होते कारण त्या बातम्यांची पध्दत अजून पण मला आठवते एकदम शांत आणि सविस्तर होती एकदम पद्धतशीर कुठेच कधीच तो आरडाओरडा या धांगडधिंगा ते ब्रेकिंग न्युज आणि टीरपी साठी वरचढ करून अस काही नसायचं खर सांगू अजून पण ते दिवस चांगलेच आठवतात. करण आज त्याच रूपांतर मीडिया मध्ये झालं आहे.
आज तो काळ आणि आताचा काळ त्या बद्धल बोलायचं तर खर तर शीव्या घालूशी वाटत आहे. हे आज कालचे न्युज वाले एकाच दोन कधी आणि काय करतील कारण एडिटिंगचा जमाना आहे. हे टीरपी मिळवण्यासाठी काय नाही ते करतील आणि उगाच त्या सध्या न्युजची ब्रेकींग न्यूज कशी करतील कोणाला माहीत पण खर तर त्या न्युज लवकर कळतात पण त्या न्यूजचा अर्थचा अनर्थ करून टाकतात.
आताच बघा ना कोरोना किती घातक झाला आहे आपल्या सर्वांच माहीत आहे. कोरोनामुळे सर्वच जण घाबरले आहेत. काय करणार घाबराव तर लागणारच आणि सर्वच तसे घाबरले आहे पण हे मीडियावाले टी आर पी साठी न्युज वर अश्या काही व्हिडिया दाखवत आहेत की पब्लिक अजून घाबरून जात जात आहेत. खर तर ब्रेकिंग न्युज ब्रेकिंग न्युज करून लोकांच्या मनाशी खेळत आहे. कोण गेलं कसा मेला अक्षरशः मशानातील जागा पण त्यांनी सोडल्या नाहीत. अरे काय चालवलं आहे हे अरे किती ते आणि कोणत्या पातळीवर जातंय रे. मला अक्षरशः किव आली आहे ह्या सर्वांची आता तर न्युज बघायचं सोडुनच दिल बस कंटाळून गेलो.
मीडिया वाले अरे तुम्हाला टी आर पिच वाढवायची आहे ना तर काही अश्या न्युज दाखवा की लोकांना त्याचा फायदा होईल आणि रोज बघतील पण कुठे कोणते हॉस्पिटल आहे कुठे उपचार व्यवस्थित भेटतील कुठे औषध लवकर भेटील तो पेशंट कसा बरा झाला शक्य नसताना पण एखाद्या वृद्ध व्यक्तीने कोरोनावर कसा मत केला अश्या काही न्युज दाखवा. पण नाही तुम्हाला तुमच्या ब्रेकिंग न्युजची पडली आहे. अरे बस करा का लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.
आज ह्या सर्व लोकांना धैर्याची गरज आहे आणि ह्या संकटातून लबाहेर कस निघायचं आहे ह्याची गरज आहे. तर कृपा करून अश्या काही ब्रेकिंग न्युज दाखवा की ह्या सर्व लोकांना एनर्जी येईल. आणि कोरोना नावच राक्षसाला मारण्याची ताकद येईल. कारण आता हेच मोठं शस्त्र आहे.





