दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा.
आज आपण मुंबईत राहतो पण त्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. खरच ती जाणून घेणं गरजेचं आहे का की नाही, तर माझे मत आहे हो खरच गरजेचं आहे नक्कीच मुंबई ही एक स्वप्नना सातत्यात घडवण्याचे एक ठिकाण आहे अस बोलतात ते खरच आहे का पण ते कशी निर्माण झाले हे कोणालाच माहिती नसेल त्यात कोणाकोणाचा हातभार लागला आहे. हे जाणून घेण्याची मला तर उस्तुकता होतीच म्हणून हे पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा मी घरी घेऊन आलो.
इतिहासाची आवड असल्यामुळे अस काही बघायला भेटले की नक्कीच मी त्या ठिकाणाला भेट देतो. त्यात मुंबईचा स्थानिक असल्यामुळे त्यात विशेष आकर्षण मुंबईसाठी होत. जस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला तसेच मुंबईचे पण काही इतिहास असू शकतो ना काही जुनी ठिकाणे जुनी मंदिरे मुंबई मधील किल्ले इत्यादी...
मुंबईच्या पाऊलखुणा ह्या पुस्तकात मुंबईचे पहिलं रेल्वे स्थानक, पहिले रुग्णालय, पहिले गोदी, पहिला टॉवर, आधुनिक मंडई, पहिला गणेशउत्सव, पहिला भारतीय चित्रपट तसेच मुंबई पोलिस कसा घडला, प्रभादेवी मंदिरचा इतिहास, मुंबईत बेस्ट बस सेवा कशी सुरुवात झाली. अशी बरीच माहिती ह्या पुस्तकात अगदी सविस्तर पणे वर्णन केले आहे. खरं सांगितलं तर मी पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं कि बऱ्याच दिवसापासून येता जात एक दगड नजरेस पदाचा दादर जवळ चित्रा सिनेमाच्या समोर गुरु नानक कॉलेज रोडला तो एवढा जुना आहे कि नक्कीच ह्या दगडाचा काही ना काही इतिहास असू शकतो असं वाटत होत. पण शेवटी मला ह्या दगडाची माहिती ह्या पुस्तका मार्फत भेटली. अजून एक उदाहरण आताच आमचं स्प्रिंग मिल चाळीचे पुनर्वसन बाबत चर्चा चालू आहेच त्यामुळे ह्या गिरणी कामगाराबद्दल माहिती पाहिजे होतीच कारण मी पण गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामूळे मला ती माहिती मिळवणे गरजेचे होते. ती पण ह्या पुस्तका मार्फत अगदी जशी पाहिजे होती तशीच मला भेटली आणि माझे बरेच प्रश्न सुटले. हो बरका माझा पुढचा ब्लॉग ह्याच गिरणी कामगारा बद्दल असणार आहे.
जर खरच कोणाला मुंबई बद्दल विशेष आकर्षण असेल तर हे पुस्तक नक्की तुमच्या घरी घेऊन या आणि वाचा बरीच माहिती आणि मुंबई आधी कशी होती आणि आता कशी आहे. तुमचे पण बरेच प्रश्न सुटतील. हे वाचून झाल्या नंतर लगेच पुस्तकाच्या लेखकांना संपर्क केला खुप मस्त वाटलं त्यांना पण खुप बरं वाटलं असेल कारण त्यांच्या बोलण्यावरून समजलं एका वाचकाने पुस्तकाचा प्रतिसाद दूरध्वनी मार्फत संपर्क केल्या बद्दल त्यांनी मला अजून एक पुस्तक सुचवल आणि ते नक्कीच मी घेऊन येईन कारण आता तर अजूनच आकर्षण झालं आहे ह्या मुंबई बद्दल जाणून घेण्यासाठी ह्या मुंबईने अनेक गोर गरीबांचे पोट भरली काहींची स्वप्न पूर्ण केली आहेत आणि लोकांना जगण्याची उम्मीद दिली आहे, बरेच लोकांची घर बसवली आहेत, गोरगरिबांना पोट भरली आहेत ह्या मुंबईने अशी ह्या मुंबईने कित्येकांचे स्वप्न सातत्यात उतवरले आहे अशी ही मुंबई...