मराठा आरक्षण जास्त सविस्तर नाही बोलत कारण सर्वाना माहीतच आहे. आपण का हे आरक्षण मागत आहोत. हे आरक्षण मराठीच लोकांसाठी नाही तर त्या मागासवर्गीय लोकांसाठी कारण गरीब गरीब होत आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत. ज्यांना आरक्षण भेटत आहे तो त्याची ऐपत नसून पण वरचढ होत आहे आणि ज्यांना आरक्षण नाही तो कितीही त्या पदासाठी परफेक्ट असला तर तो मागेच राहत आहे. आम्ही बोलतो हा असा भेदभाव कडून टाका हे आरक्षण आम्हाला पण नको तर मग कोणालाच नका देऊ आरक्षण.
ह्या आरक्षणामुळे अगदी लहानपणा पासुन ते मोठं होईपर्यंत सामोरे जावे लागते शाळा कॉलेजचे ऍडमिशन जॉब सरकारी नोकरी पासून पोलिस भरती अशा प्रत्येक ठिकाणी ह्या आरक्षणाला सामोरे जावे लागते. का अस हा तर अत्याचारच आहे ना. मग ह्या अत्याचाराला सामोरे जावेच लागणार होते म्हणून मराठी माणूस पुढे आला त्या आरक्षनासाठी आणि प्रत्येक राज्यात हे लाखोने मराठी मोर्चे काढण्यात आले कारण सर्वांना सारखाच न्याय मिळावा म्हणूनच आजवर हा मराठी माणूस झगडत आहे. तो स्वतः साठी नाही तर त्या गोरगरीब कुटुंबात त्याला हक्काचा न्याय मिळावा.
इतिहास साक्षी आहे आजवर असे मोर्चे कधीच नाही झाले. जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मराठी माणूस त्यांच्या हक्कासाठी झगडत होता झगडत आहे आणि झगडत राहणार...
एक मराठा लाख मराठा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा