आज थोड सह्याद्रीच्या बाहेर म्हणजे आमच्या कंपाऊंड मधील काही आठवणी ज्या खूप मुलानं बरोबर आहेत.
आठवणीतील दोन शब्द सतीश धुळे बद्दल खूप दिवस झाले ह्या व्यक्ती बद्दल काही शब्द तुमच्या पुढे मांडायचे होतेच. बरीच वर्ष ओलांडली सतीश च्या निधनाला पण अजून पण तो आमच्या आठवणीतून जात नाही त्याचं कारण सांगतो. आताच पार पडलेली क्रिकेट एंटर कंपाऊंड स्पर्धा होत्या. दरवर्षी प्रमाणे ह्याहि वर्ष अतिशय चांगल्या प्रमाणे आणि आठवणीने स्पर्धा पार पडल्या. त्याबद्दल ५ नंबर चे आभार. त्याचं बरोबर सचिन सावंत चे पण कारण मला आठवत कि सचिन सतीशचा जवळचा मित्र आहे. आणि क्रिकेट मधील त्याचे जवळचे मित्र म्हणजे बाबू राणे योगेश कोंढाळकर क्रिकेटच त्याचे करियर आपल्याच मैदानातून म्हणजे स्प्रिंग मिल कंपाऊंड सुरु झालं त्याची आठवण कायम रहावी म्हणून मैदानाला आपला मित्र सतीश धुळे ह्या नावाने ओळखलं जावं म्हणून मैदानाला त्या नावाने नाव देण्यात आले. सतीश बद्दल सांगायचं बोललं तर क्रिकेट टेनिस मध्ये आपलच मैदान नाही तर नायगांव मधील सर्वच मैदान गाजवले आहेत. आणि मुंबई मध्ये खूप नाव गजल होत. आणि आता त्याच्या पावला वर पाऊल ठेऊन माझा कॉलेज मित्र अजित मोहिते त्याची आठवण करून देत आहे. आणि बहुतेक तो सतीशला गुरु मानतो. असं मी ऐकलं आहे. असो सतीश बद्दल सांगायचं बोललं तर तो आमच्या कंपाऊंडचा ऑल राउंडर होता. कारण फक्त क्रिकेटच नाही तर खो खो, कबड्डी, हॉलीबॉल असे बरेच खेळ ह्या मैदानात गाजवले आहेत.
एक किस्सा आहे. मी लहान होतॊ. क्रिकेट तर खेळलो त्याच बरोबर खो खो पण सतीश बरोबर मी खेळलो आहे. अजून पण तो किस्सा आठवतो अजून पर्यंत असं झालं नव्हतं कि खो खो खेळताना रोज तर प्रॅक्टिस चालूच असायची एक वर्ष आपल्याच मैदानात स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या आणि एका स्पर्धे मध्ये अक्षरशा खो खो चा जो पोल असतो तो तुटला होता. पहिलीच वेळ होती अस झालं होत. अजून पण तो क्षण आठवतो. मी ती स्पर्धा बघितली होती. आणि मी एकदा ओपन स्पर्धे मध्ये मला सुद्धा एंट्री भेटली होती सतीश बरोबर खेळायलची तेव्हा मी असेल ५ वी का ६ वी ला दादरला स्पर्धा होती. अजून पण आठवत. हे तर नक्कीच नाही मी विसरणार.
अजून एक एका न्युज पेपर मध्ये bike बरोबर फोटो पण आला होता आयकॉन म्हणून आठवत त्या ऍड बद्दल पण मी ती ऍड बघितली होती बहुतेक मुलांना माहित असेल का माहित नाही पण मला आठवत आहे. आणि क्रिकेट पण खेळलो होतोच असे बरेच काही किस्से आहेत. आणि आपल्या सर्वांच्या बरोबर ना मित्रानो. तर असा हा सतीश आमच्या आठवणीत कायमचा राहणार आहे हे. नक्की आणि त्याच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम सचिन सावंत आणि ५ नंबर करत आहेच दरवर्षी क्रिकेट एंटर कंपाऊंड स्पर्धेच्या मध्येमातून सतीश सर्वांच्या आठवणीत राहील. एवढ नक्कीच.
तसेच राकेश ह्याचा बरोबर पण क्रिकेट खेळलो आहे. एक Match ५ रु, २ रु, १० रू अशी आठवतात हे दिवस आणि सतीश चा भाऊ निलेश जास्त नाही माझा ओळखीचा पण खेळताना बघितलं होत. तो जास्त क्रिकेट नाही खेळायचं एवढ आठवत. बस जास्त काही नाही बोलत. अश्या बऱ्याच आठवणी आहेत. जर तुम्हाला पण काही आठवत असेल तर कंमेंट करा ह्या ३ मित्रांन बद्दल. ह्या ३ मित्रांचा अपघाती मृत्यू फार कमी वयात झाला काय त्या त्याच्या आई बाबांन बद्दल वाईट वाटतच.
पण देवा पुढे काय चालणार. शेवटी बोलतातना चांगल्या माणसांना देव लवकर बोलवतात तस काही तरी बोलतात तरी पण अजून वाटत नाही कि हे आमच्या पासून दूर गेले आहेत. ते सदैव आमच्या बरोबर असतील. आणि कुठे ना कुठे ते मैदानात आम्हाला खेळताना बघत असतीलच. एवढाच बोलतो. बाकी तुम्ही सांगा ह्या काही आठवणी माझा तुटक्या मुटक्या शब्दात मांडल्या आहेत. काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि माफी असावी. पण मला राहवलं नाही म्हणून बोलून पोस्ट केली पटलं तर नक्की कळवा.
सतीश निलेश आणि राकेश तुमची आठवण कायम आमच्या मनात राहील.
#स्प्रिंग मिल कंपाऊंड

He was a great player also a great human being. I always missing him. Loved this blog ❤️
उत्तर द्याहटवा