शनिवार, १५ जानेवारी, २०२२

मुंबईच्या पाऊलखुणा


 
मुंबईच्या पाऊलखुणा

      दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा

      आज आपण मुंबईत राहतो पण त्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. खरच ती जाणून घेणं गरजेचं आहे का की नाही, तर माझे मत आहे हो खरच गरजेचं आहे नक्कीच मुंबई ही एक स्वप्नना सातत्यात घडवण्याचे एक ठिकाण आहे अस बोलतात ते खरच आहे का पण ते कशी निर्माण झाले हे कोणालाच माहिती नसेल त्यात कोणाकोणाचा हातभार लागला आहे. हे जाणून घेण्याची मला तर उस्तुकता होतीच म्हणून हे पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा मी घरी घेऊन आलो.

      इतिहासाची आवड असल्यामुळे अस काही बघायला भेटले की नक्कीच मी त्या ठिकाणाला भेट देतो. त्यात मुंबईचा स्थानिक असल्यामुळे त्यात विशेष आकर्षण मुंबईसाठी होत. जस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला तसेच मुंबईचे पण काही इतिहास असू शकतो ना काही जुनी ठिकाणे जुनी मंदिरे मुंबई मधील किल्ले इत्यादी...

      मुंबईच्या पाऊलखुणा ह्या पुस्तकात मुंबईचे पहिलं रेल्वे स्थानक, पहिले रुग्णालय, पहिले गोदी, पहिला टॉवर, आधुनिक मंडई, पहिला गणेशउत्सव, पहिला भारतीय चित्रपट तसेच मुंबई पोलिस कसा घडला, प्रभादेवी मंदिरचा इतिहास, मुंबईत बेस्ट बस सेवा कशी सुरुवात झाली. अशी बरीच माहिती ह्या पुस्तकात अगदी सविस्तर पणे वर्णन केले आहे. खरं सांगितलं तर मी पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं कि बऱ्याच दिवसापासून येता जात एक दगड नजरेस पदाचा दादर जवळ चित्रा सिनेमाच्या समोर गुरु नानक कॉलेज रोडला तो एवढा जुना आहे कि नक्कीच ह्या दगडाचा काही ना काही इतिहास असू शकतो असं वाटत होत. पण शेवटी मला ह्या दगडाची माहिती ह्या पुस्तका मार्फत भेटली. अजून एक उदाहरण आताच आमचं स्प्रिंग मिल चाळीचे पुनर्वसन बाबत चर्चा चालू आहेच त्यामुळे ह्या गिरणी कामगाराबद्दल माहिती पाहिजे होतीच कारण मी पण गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामूळे मला ती माहिती मिळवणे गरजेचे होते. ती पण ह्या पुस्तका मार्फत अगदी जशी पाहिजे होती तशीच मला भेटली आणि माझे बरेच प्रश्न सुटले. हो बरका माझा पुढचा ब्लॉग ह्याच गिरणी कामगारा बद्दल असणार आहे. 

     जर खरच कोणाला मुंबई बद्दल विशेष आकर्षण असेल तर हे पुस्तक नक्की तुमच्या घरी घेऊन या आणि वाचा बरीच माहिती आणि मुंबई आधी कशी होती आणि आता कशी आहे. तुमचे पण बरेच प्रश्न सुटतील. हे वाचून झाल्या नंतर लगेच पुस्तकाच्या लेखकांना संपर्क केला खुप मस्त वाटलं त्यांना पण खुप बरं वाटलं असेल कारण त्यांच्या बोलण्यावरून समजलं  एका वाचकाने पुस्तकाचा प्रतिसाद दूरध्वनी मार्फत संपर्क केल्या बद्दल त्यांनी मला अजून एक पुस्तक सुचवल आणि ते नक्कीच मी घेऊन येईन कारण आता तर अजूनच आकर्षण झालं आहे ह्या मुंबई बद्दल जाणून घेण्यासाठी ह्या मुंबईने अनेक गोर गरीबांचे पोट भरली काहींची स्वप्न पूर्ण केली आहेत आणि लोकांना जगण्याची उम्मीद दिली आहे, बरेच लोकांची घर बसवली आहेत, गोरगरिबांना पोट भरली आहेत ह्या मुंबईने अशी ह्या मुंबईने कित्येकांचे स्वप्न सातत्यात उतवरले आहे अशी ही मुंबई...



रविवार, २३ मे, २०२१

मीडिया

 

          पूर्वी काळी न्युज कशी असायची तर दूरदर्शन वरील संध्याकाळी ७.०० च्या बातम्या आजोबांन पासुन ते आपल्या आई वडिलांना पर्यंत सुरू असलेल्या. मला अजून आठवत आहे लहान पणी रोज त्या ७.०० च्या बातम्या आम्हाला बाकी सर्व प्रोग्राम बंद करायला लागत होते कारण संध्याकाळी ७.०० वाजले की दिवस भरतील सर्वच घडामोडी समजत होत्या म्हणून आवर्जून सर्वच जण त्या बातम्या बघत होते कारण त्या बातम्यांची पध्दत अजून पण मला आठवते एकदम शांत आणि सविस्तर होती एकदम पद्धतशीर कुठेच कधीच तो आरडाओरडा या धांगडधिंगा ते ब्रेकिंग न्युज आणि टीरपी साठी वरचढ करून अस काही नसायचं खर सांगू अजून पण ते दिवस चांगलेच आठवतात. करण आज त्याच रूपांतर मीडिया मध्ये झालं आहे.

          आज तो काळ आणि आताचा काळ त्या बद्धल बोलायचं तर खर तर शीव्या घालूशी वाटत आहे. हे आज कालचे न्युज वाले एकाच दोन कधी आणि काय करतील कारण एडिटिंगचा जमाना आहे. हे टीरपी मिळवण्यासाठी काय नाही ते करतील आणि उगाच त्या सध्या न्युजची ब्रेकींग न्यूज कशी करतील कोणाला माहीत पण खर तर त्या न्युज लवकर कळतात पण त्या न्यूजचा अर्थचा अनर्थ करून टाकतात. 

         आताच बघा ना कोरोना किती घातक झाला आहे आपल्या सर्वांच माहीत आहे. कोरोनामुळे सर्वच जण घाबरले आहेत. काय करणार घाबराव तर लागणारच आणि सर्वच तसे घाबरले आहे पण हे मीडियावाले टी आर पी साठी न्युज वर अश्या काही व्हिडिया दाखवत आहेत की पब्लिक अजून घाबरून जात जात आहेत. खर तर ब्रेकिंग न्युज ब्रेकिंग न्युज करून लोकांच्या मनाशी खेळत आहे. कोण गेलं कसा मेला अक्षरशः मशानातील जागा पण त्यांनी सोडल्या नाहीत.  अरे काय चालवलं आहे हे अरे किती ते आणि कोणत्या पातळीवर जातंय रे. मला अक्षरशः किव आली आहे ह्या सर्वांची आता तर न्युज बघायचं सोडुनच दिल बस कंटाळून गेलो. 

मीडिया वाले अरे तुम्हाला टी आर पिच वाढवायची आहे ना तर काही अश्या न्युज दाखवा की लोकांना त्याचा फायदा होईल आणि रोज बघतील पण कुठे कोणते हॉस्पिटल आहे कुठे उपचार व्यवस्थित भेटतील कुठे औषध लवकर भेटील तो पेशंट कसा बरा झाला शक्य नसताना पण एखाद्या वृद्ध व्यक्तीने कोरोनावर  कसा मत केला  अश्या काही न्युज दाखवा. पण नाही तुम्हाला तुमच्या ब्रेकिंग न्युजची पडली आहे. अरे बस करा का लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. 

         आज ह्या सर्व लोकांना धैर्याची गरज आहे आणि ह्या संकटातून लबाहेर कस निघायचं आहे ह्याची गरज आहे. तर कृपा करून अश्या काही ब्रेकिंग न्युज दाखवा की ह्या सर्व लोकांना एनर्जी येईल. आणि कोरोना नावच राक्षसाला मारण्याची ताकद येईल. कारण आता हेच मोठं शस्त्र आहे.

शनिवार, ८ मे, २०२१

मराठा आरक्षण


        मराठा आरक्षण जास्त सविस्तर नाही बोलत कारण सर्वाना माहीतच आहे. आपण का हे आरक्षण मागत आहोत. हे आरक्षण मराठीच लोकांसाठी नाही तर त्या मागासवर्गीय लोकांसाठी कारण गरीब गरीब होत आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत. ज्यांना आरक्षण भेटत आहे तो त्याची ऐपत नसून पण वरचढ होत आहे आणि ज्यांना आरक्षण नाही तो कितीही त्या पदासाठी परफेक्ट असला तर तो मागेच राहत आहे. आम्ही बोलतो हा असा भेदभाव कडून टाका हे आरक्षण आम्हाला पण नको तर मग कोणालाच नका देऊ आरक्षण.


          ह्या आरक्षणामुळे अगदी लहानपणा पासुन ते मोठं होईपर्यंत सामोरे जावे लागते शाळा कॉलेजचे ऍडमिशन जॉब सरकारी नोकरी पासून पोलिस भरती अशा प्रत्येक ठिकाणी ह्या आरक्षणाला सामोरे जावे लागते. का अस हा तर अत्याचारच आहे ना. मग ह्या अत्याचाराला सामोरे जावेच लागणार होते म्हणून मराठी माणूस पुढे आला त्या आरक्षनासाठी आणि प्रत्येक राज्यात हे लाखोने मराठी मोर्चे काढण्यात आले कारण सर्वांना सारखाच न्याय मिळावा म्हणूनच आजवर हा मराठी माणूस झगडत आहे. तो स्वतः साठी नाही तर त्या गोरगरीब कुटुंबात त्याला हक्काचा न्याय मिळावा. 




        इतिहास साक्षी आहे आजवर असे   मोर्चे कधीच नाही झाले. जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मराठी माणूस त्यांच्या हक्कासाठी झगडत होता झगडत आहे आणि झगडत राहणार...



एक मराठा लाख मराठा...

शनिवार, १ मे, २०२१

१ महाराष्ट्र दिन

१ मे महाराष्ट्र दिन

 

        १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यामूळे १ मे हा महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा केला जातो. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी आंदोलने केली आणि ह्या आंदोलनात १०५ हुतात्मे शहिद झाले ह्या हुतात्म्यांच्या बलिदानमूळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमतं घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि त्यामुळेच आज १ मे आपण महाराष्ट्र दिन म्हूणन साजरा करतो. मनाचा मुजरा ह्या शाहिद हुतात्म्यांना.

        आज महाराष्ट्र कोरोना रुपी संकटात सापडलेला आहे. सरकारने या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन केलेला आहे. सर्वजण घरात अडकून पडले आहेत. जो तो स्वतःची व स्वतःच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी स्वतःला घरात बंदीस्त करून घेत आहे. तरीही त्यात हजारो हात बाहेर राबत आहेत. आपण सुरक्षित राहावं म्हणून स्वतःच्या आणि परिवाराच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काम करत आहे. जे घरात बंदीस्त सामान्य लोक आहेत त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. खरच सलाम त्यांच्या शौर्याला. कोरोना काळात ज्या कोरोना योध्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या तमाम ज्ञात अज्ञात कोरोना योध्याना महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मानाचा मुजरा. 



जय महाराष्ट्र...


गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सतीश धुळे


       आज थोड सह्याद्रीच्या बाहेर म्हणजे आमच्या कंपाऊंड मधील काही आठवणी ज्या खूप मुलानं बरोबर आहेत. 

आठवणीतील दोन शब्द सतीश धुळे बद्दल खूप दिवस झाले ह्या व्यक्ती बद्दल काही शब्द तुमच्या पुढे मांडायचे होतेच. बरीच वर्ष ओलांडली सतीश च्या निधनाला पण अजून पण तो आमच्या आठवणीतून जात नाही त्याचं कारण सांगतो. आताच पार पडलेली क्रिकेट एंटर कंपाऊंड स्पर्धा होत्या. दरवर्षी प्रमाणे ह्याहि वर्ष अतिशय चांगल्या प्रमाणे आणि आठवणीने स्पर्धा पार पडल्या. त्याबद्दल ५ नंबर चे आभार. त्याचं बरोबर सचिन सावंत चे पण कारण मला आठवत कि सचिन सतीशचा जवळचा मित्र आहे. आणि क्रिकेट मधील त्याचे जवळचे मित्र म्हणजे बाबू राणे योगेश कोंढाळकर क्रिकेटच त्याचे करियर आपल्याच मैदानातून म्हणजे स्प्रिंग मिल कंपाऊंड सुरु झालं त्याची आठवण कायम रहावी म्हणून मैदानाला आपला मित्र सतीश धुळे ह्या नावाने ओळखलं जावं म्हणून मैदानाला त्या नावाने नाव देण्यात आले. सतीश बद्दल सांगायचं बोललं तर क्रिकेट टेनिस मध्ये आपलच मैदान नाही तर नायगांव मधील सर्वच मैदान गाजवले आहेत. आणि मुंबई मध्ये खूप नाव गजल होत. आणि आता त्याच्या पावला वर पाऊल ठेऊन माझा कॉलेज मित्र अजित मोहिते त्याची आठवण करून देत आहे. आणि बहुतेक तो सतीशला गुरु मानतो. असं मी ऐकलं आहे. असो सतीश बद्दल सांगायचं बोललं तर तो आमच्या कंपाऊंडचा ऑल राउंडर होता. कारण फक्त क्रिकेटच नाही तर खो खो, कबड्डी, हॉलीबॉल असे बरेच खेळ ह्या मैदानात गाजवले आहेत. 

एक किस्सा आहे. मी लहान होतॊ. क्रिकेट तर खेळलो त्याच बरोबर खो खो पण सतीश बरोबर मी खेळलो आहे. अजून पण तो किस्सा आठवतो अजून पर्यंत असं झालं नव्हतं कि खो खो खेळताना रोज तर प्रॅक्टिस चालूच असायची एक वर्ष आपल्याच मैदानात स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या आणि एका स्पर्धे मध्ये अक्षरशा खो खो चा जो पोल असतो तो तुटला होता. पहिलीच वेळ होती अस झालं होत. अजून पण तो क्षण आठवतो. मी ती स्पर्धा बघितली होती. आणि मी एकदा ओपन स्पर्धे मध्ये मला सुद्धा एंट्री भेटली होती सतीश बरोबर खेळायलची तेव्हा मी असेल ५ वी का ६ वी ला दादरला स्पर्धा होती. अजून पण आठवत. हे तर नक्कीच नाही मी विसरणार. 

अजून एक एका न्युज पेपर मध्ये bike बरोबर फोटो पण आला होता आयकॉन म्हणून आठवत त्या ऍड बद्दल पण मी ती ऍड बघितली होती बहुतेक मुलांना माहित असेल का माहित नाही पण मला आठवत आहे. आणि क्रिकेट पण खेळलो होतोच असे बरेच काही किस्से आहेत. आणि आपल्या सर्वांच्या बरोबर ना मित्रानो. तर असा हा सतीश आमच्या आठवणीत कायमचा राहणार आहे हे. नक्की आणि त्याच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम सचिन सावंत आणि ५ नंबर करत आहेच दरवर्षी क्रिकेट एंटर कंपाऊंड स्पर्धेच्या मध्येमातून सतीश सर्वांच्या आठवणीत राहील. एवढ नक्कीच.

तसेच राकेश ह्याचा बरोबर पण क्रिकेट खेळलो आहे. एक Match ५ रु, २ रु, १० रू अशी आठवतात हे दिवस आणि सतीश चा भाऊ निलेश जास्त नाही माझा ओळखीचा पण खेळताना बघितलं होत. तो जास्त क्रिकेट नाही खेळायचं एवढ आठवत. बस जास्त काही नाही बोलत. अश्या बऱ्याच आठवणी आहेत. जर तुम्हाला पण काही आठवत असेल तर कंमेंट करा ह्या ३ मित्रांन बद्दल. ह्या ३ मित्रांचा अपघाती मृत्यू फार कमी वयात झाला काय त्या त्याच्या आई बाबांन बद्दल वाईट वाटतच. 

पण देवा पुढे काय चालणार. शेवटी बोलतातना चांगल्या माणसांना देव लवकर बोलवतात  तस काही तरी बोलतात तरी पण अजून वाटत नाही कि हे आमच्या पासून दूर गेले आहेत. ते सदैव आमच्या बरोबर असतील. आणि कुठे ना कुठे ते मैदानात आम्हाला खेळताना बघत असतीलच. एवढाच बोलतो. बाकी तुम्ही सांगा ह्या काही आठवणी माझा तुटक्या मुटक्या शब्दात मांडल्या आहेत. काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि माफी असावी. पण मला राहवलं नाही म्हणून बोलून पोस्ट केली पटलं तर नक्की कळवा.

सतीश निलेश आणि राकेश तुमची आठवण कायम आमच्या मनात राहील.

#स्प्रिंग मिल कंपाऊंड

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

राजकारण

 राजकारण


          माझे हे दुसरे आर्टिकल खर सांगू तर मी माझे दुसरे आर्टिकल छत्रपती शिवाजी महाराजांनी वरून लिहणार होतो. पण काय करू आता जी परिस्थिती आहे त्या वरून थोडं माझं मत मांडत आहे ह्या आर्टिकल मार्फत.

          तुम्हा सर्वांना माहीत असेल आता काय परिस्थिती चालू आहे. देशाची एवढी बेक्कार हालत चालू आहे तर ह्याला जबाबदार कोण आहे. तुम्हाला माहीत असेल सांगायची गरज नाही. पण का एवढी बेक्कार परिस्तिथी आहे. तर ह्याच कारण हे राजकारणी लोकच आहेत. मी कोणा एका पक्षाला दोष देत  कारण सर्व एकाच माळेचे मणी आहेत. एक सत्तेवर बसला की दुसऱ्याला बगवत नाही आणि तेच आता झालं आहे. पण आता ती वेळ आहे का हे असं एक मेकांची धून भांडी, एक मेकांना टोनगे मारण्याची आहे का ही वेळ सांगा. संपूर्ण देशात काय हालत चालू आहे माणसं हजारो ने मरत आहेत काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. पोटचा घास भेटत नाही. कोणाचे वडील, आई, भाऊ, बहीन, आजी आजोबा कोणाचा मुलगा जो त्या कुटुंबातील एकच आसरा होता गमावून बसलेले आहे. तरी पण ही प्रजा तुमच्या वर विश्वास ठेवत आहे. पुढे परिस्थिती सुधारेल पण नाही असच जर राजकारण चालत असेल तर हे राजकारणी लोक हा भारत देश विकून खातील. बाहेरील देशात कोरोना हळूहळू नाहीस होत चालू आहे परिस्थिती सुदारत चालू झाली आहे. आपल्या भारत देशात हे राजकारणी लोक काय कोरोना जाऊ देणार नाही असं वाटत आहे. कारण ह्यांना काहीही पडली नाही ह्या गरीब जनतेची काही पण हालत होऊद्या. ह्यांना फक्त सत्ता महत्वाची आहे. तिकडे जनता मरू देत तडफडू देत नाही तर काहीही होउदे. बस हे फक्त सत्तेचे भुकेले आहेत. जी परिस्तिथी ह्या सामान्य जणतेवर आली आहे ना ती तुमच्या सर्वांवर आली पाहिजे मग समजेल काय ते.

          अजून पण वेळ नाही गेली परिस्थिती सुधारू शकते. माहीत आहे असं नाही होणार पण एकदा ह्या मोठ्या कोरोना संकटाला मात करण्यासाठी या सर्व पक्षांनी एकत्र मिळून काम करा आणि वाचवा ह्या भारत देशातील जनतेला नाही तरी ही जणताच राहिली नाही तर पुढे काय होईल तुम्हाला हे राजकारण खेळण्यासाठी ही जाणताच उरणार नाही आणि जी आहे ती पण तुमच्या वर विश्वास ठेवणार नाही. कृपा करून ह्या सामान्य जनतेसाठी तरी एकत्र या ह्या सामान्य जनतेचे हाल बघून नंतर खुप वेळ आहे. मग बसा खेळत राजकारण नाही तुम्हांला कोण काही बोलणार पण आत्ता तुम्हीच हे संकटं घालवू शकता. जशी आपण बाहेरील देशांना मदत केली आहे तशी आपण सर्वांनी एकत्र या.

          अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती तुम्हा सर्वाना कळकळून विनंति वाचवा ह्या भारत मातेला आणि ह्या गोरगरीब जनतेला तुमची गरज आहे. तुम्हीच वाचवू शकाल ह्या मोठ्या कोरोना नावाच्या भयानक संकटांतून आणि बनवा एक महासत्ता जगाला दाखवून द्या की भारताने बाकीच्या देशाला आधी संकटातून बाहेर काढलं आणि नंतर स्वता संकट मुक्त झाला. दाखवून द्या ह्या जगाला भारत काय चीज आहे ते एकत्र आला तर काय करू शकते. 

          भारतातील ह्या सामान्य जनतेचे शब्द आहेत. हे आर्टिकल आवडल्यास सर्वांपर्यंत पोहचेल अस शेअर करा आणि तुमचे मत जरून कळवा...

रविवार, १८ एप्रिल, २०२१

माँसाहेब जिजाऊ



जय जिजाऊ जय शिवराय


आज जो हा महाराष्ट्र आहे तो फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊ मुळेच आहे. याच करण तुम्हा सर्वांना माहीत असेलच शहाजी राजांनी जे स्वप्न बघितले आणि ते त्यांना प्रत्येक्षात उतरवायचे होते. पण काही कारणांमुळे ते त्यांना नाही करता आहे पण त्यांच्या पत्नी माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या मातोश्री जिजाऊ यांनी ते निर्माण केले. फक्त  निर्माण केले नाही तर ते अस केले की आजही ३५० वर्ष ओलांडून गेली तरी हा महाराष्ट्र विसरणार नाही. अस मोठं झाड त्यांनी उभारलं ते म्हणजे स्वराज्य. 

माँसाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहान पणा पासून शूर पराक्रमी योधांच्या गोष्टी सांगण्यात सुरुवात केल्या होत्या. त्यांचे शिक्षक, कला, तलवार चालवणे भाले चालवणे अश्या बऱ्याच कला त्यांना लहान पणा पासूनच शिकवण्यात सुरू केलं होत्या. लढाया, डावपेच, राजनीती जमेल ते शिक्षण त्यांनी शिकवले काही वेळा तर त्या स्वतः हातात तलवार घेऊन महाराजांना शिकवत होत्या. त्यामुळेच पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एका छोट्याशा रोपाच रूपांतर मोठ्या झाडात केलं ते म्हणजे स्वराज्य. पण स्वराज्य असच उभं नाही झालं तर जिजाऊ स्वतः सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज नसताना त्या लढाईत शामिल होत कारण त्यांना ठाऊक होतं स्वराज्य असाच नाही उभ राहणार कारण राजाने सिहासणवार बसून मावळे लढायला जाणे हे पटतच नव्हते त्यांना चांगलेच माहीत होते आणि ती शिकवण त्यांनी छत्रपतींना पण दिली होती. तेच शहाजी राजांचे आणि माँसाहेब जिजाऊंचे स्वप्न काही जिवलग सवंगडी सरदार आणि मावळे  साथीने आणि त्यांच्या रक्ताने ते प्रत्येक्षात सतत्यात उतरवले. 

आजही महाराष्ट्र आणि हिंदुस्तान या राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना विसरू शकणार नाही आणि   हे अफाट सह्याद्री आणि हे गगनाला भिडणारे गड किल्ले अजूनही ३५० वर्ष ओलांडून गेली तरी या गड किल्याचे बुरुज अस्तित्वात असल्याचे साक्षी आहेत.

मुंबईच्या पाऊलखुणा

  मुंबईच्या पाऊलखुणा       दादर मधील पुस्तकांच्या स्टोर मध्ये नजरेस पडलेलं एक पुस्तक मुंबईच्या पाऊलखुणा .        आज आपण मुंबईत राहतो पण त्या...